परभणी: फसवणूक प्रकरणातील आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:24 IST2019-05-19T00:23:59+5:302019-05-19T00:24:43+5:30
१६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद असलेल्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी १६ मे रोजी जालना येथून ताब्यात घेतले़

परभणी: फसवणूक प्रकरणातील आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद असलेल्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी १६ मे रोजी जालना येथून ताब्यात घेतले़
शहरातील नवा मोंढा परिसरातील टिपू सुलतान मल्टीस्टेट संस्थेत जयप्रकाश राठी यांनी जमा केलेले १६ लाख रुपये मुदत संपल्यानंतरही परत न मिळाल्याने ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती़ त्यावरून या संस्थेचे अध्यक्ष शेख नसीम शेख रहीम (रा़ सिरसाठा) व व्यवस्थापक पांडूरंग मुक्ताराम जारस (रा़ पानेरवाडी, जालना) या दोघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला होता़ उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास जालना शहरातील योगेश नगर येथे पांडूरंग जारस यास अटक करण्यात आली़ ही कारवाई डीबी पथकाचे जमादार गजानन जंत्रे, वैजनाथ आदोडे, विशाल गायकवाड यांनी केली़ या प्रकरणाचा तपास भागवत सातपुते, मो़ उमर तपास करीत आहेत़