परभणी : परीक्षेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:17 IST2020-02-19T00:16:33+5:302020-02-19T00:17:05+5:30
बारावीची परीक्षा देवून गावाकडे परतणाºया एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० च्या सुमारास तालुक्यातील मोजमाबाद परिसरात घडली़

परभणी : परीक्षेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : बारावीची परीक्षा देवून गावाकडे परतणाºया एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० च्या सुमारास तालुक्यातील मोजमाबाद परिसरात घडली़
चोरवड येथील मारोती रामकिशन साबणे (१७) आणि त्याचे दोन मित्र शेख शिराज शेख इस्माईल (२३) व सुनील विश्वनाथ पवार (१७) हे बारावीची परीक्षा देण्यासाठी मंगळवारी मोजमाबाद येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या परीक्षा केंद्रावर आले होते़ परीक्षा संपल्यानंतर मारोती साबणे हा सायकलवरून तर त्याचे इतर दोन मित्र मोटारसायकलने गावाकडे परत जात होते़ वाटेत मोजमाबाद जवळ सायकल व मोटारसायकलचा अपघात झाला़ यात तिघेही गंभीररित्या जखमी झाले़ अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ निवासी वैद्यकीय अधिकारी वैशाली देशमुख यांनी मारोती साबणे यास मृत घोषित केले असून, गंभीर जखमी असलेल्या शेख सिराज व सुनील पवार यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात रवाना केले़