परभणी : बंडखोरांवरील कारवाईला निष्क्रियतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:11 AM2020-02-23T00:11:29+5:302020-02-23T00:12:19+5:30

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या ध्येयधोरणाला हरताळ फासून विरोधी उमेदवाराचा मनसोक्त प्रचार करणाऱ्या बंडखोरांवरील कारवाईबाबत सर्वच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांनी चुप्पी साधली आहे़ परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीतील कटू आठवणी विसरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही़

Parbhani: Acceptance of inactivity to act on the rebels | परभणी : बंडखोरांवरील कारवाईला निष्क्रियतेचे ग्रहण

परभणी : बंडखोरांवरील कारवाईला निष्क्रियतेचे ग्रहण

Next

अभिमन्यू कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या ध्येयधोरणाला हरताळ फासून विरोधी उमेदवाराचा मनसोक्त प्रचार करणाऱ्या बंडखोरांवरील कारवाईबाबत सर्वच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांनी चुप्पी साधली आहे़ परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीतील कटू आठवणी विसरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही़
निवडणुकीतील विजयाचे गणित निष्ठावान कार्यकर्त्यांच्या परिश्रमावरच अवलंबून असते़ पक्षीय विचारधारा जोपासत जनहिताची कामे करण्याचा वसा घेतलेल्या नेते मंडळींना मतदारराजाही भरभरून प्रतिसाद देत असतो़ मतदारराजा नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला तरी कधी कधी ही नेते मंडळीच पक्षीय ध्येयधोरणाला हरताळ फासून स्वत:च्या स्वार्थासाठी इतर पक्षाच्या उमेदवाराला सर्रासपणे मदत करीत असल्याचा प्रकार आतापर्यंत जिल्ह्यात अनेक निवडणुकांमध्ये पहावयास मिळाला आहे़ लोकसभा निवडणुकीत याचा परभणीकरांना प्रत्यय आला होता़ त्यानंतर चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचा कळस पाहावयस मिळाला़ अनेक वर्षे पक्षात काम करताना महत्त्वाची पदे भूषवित आर्थिक संपन्नता प्राप्त करणाºया काही नेते मंडळींनी ऐन निवडणुकीत स्वकीय उमेदवाराच्या विरोधातील पक्षाचा झेंडा हातात घेतल्याची बाब या निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवली़ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे चारही पक्ष याला अपवाद नाहीत़ शिवसेना-भाजपा युतीने एकत्रितपणे विधानसभेची निवडणूक लढविली़ जेथे शिवसेनेचे उमेदवार होते तेथे भाजपाच्या काही नेते मंडळींनी दगा फटका केला़ तर जेथे भाजपाचा उमेदवार होता तेथे शिवसेनेच्या काही नेते मंडळींनी बंडखोरी केली़ गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात ही स्थिती दिसून आली़ दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतही अशीच परिस्थिती पहावयास मिळाली़ गंगाखेड, जिंतूरमध्ये राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी स्वपक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार चालविला़ त्यात मित्र पक्ष काँग्रेसच्या नेते मंडळींनी भर टाकली़ परभणीतही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती़ पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या नेते मंडळींनी उघडपणे बंडखोरी करीत पक्षीय ध्येयधोरणे अडगळीत टाकून दिली़ बंडखोरी केल्याने पक्ष कुठलीही कारवाई करीत नाही़ नुसताच कारवाईचा इशारा देणाºया पोकळ घोषणा पक्षश्रेष्ठींकडून केल्या जातात़ त्याला भीक घालण्याची गरज नाही, असेच जणू या बंडखोरांनी ओळखले होते़ त्यामुळे एकीकडे पक्षश्रेष्ठीतील नेते मंडळी आपल्या उमेदवाराचा प्रचार करून मतदारांना मतदानासाठी साकडे घालत होते तर दुसरीकडे त्याच पक्षाच्या नावाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी विरोधी उमेदवाराच्या विजयासाठी फिरताना दिसून आले़ या बंडखोरांवर निवडणुकीनंतर कारवाई होईल, अशी वल्गना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी केली होती; परंतु, हा केवळ फुसका बार ठरला़
निवडणुका होवून जवळपास ५ महिने होत आले़; परंतु, याबाबत पक्षश्रेष्ठी चुप्पी साधून आहे. विधानसभेला बंडखोरी केलेले नेते आता पुन्हा एकदा पक्षातील व सत्तेतील महत्त्वाची पदे काबीज करून लाभ उठवित आहेत आणि बंडखोरीचा फटका बसलेले उमेदवार मात्र निवडणुकीच्या प्रचारातील कटू आठवणी काढत नाईलाजाने शांत बसून आहेत़

सनिवडणुकीत प्रकट झालेले नेते आता गायब !
निवडणुका आल्या की आपण पक्षनिष्ठ असल्याचा देखावा करीत काही नेते मंडळी प्रकटतात़ आर्थिक संपन्नतेच्या बळावर निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून त्यांच्याकडून अनेकदा निवडणुकीत तिकीटही मिळविण्यात आले़ त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणारे कार्यकर्ते बाजूला पडले़ पक्षाने जरी या प्रकटलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली असली तरी जनतेने मात्र थारा दिला नाही़ त्यामुळे जशा निवडणुका झाल्या तसे हे नेते गायब झाले आहेत़ आता पुन्हा एकदा जुनेच निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत आणि पक्षही संधीसाधूंना न आठवता या कार्यकर्त्यांकडे आशेने पाहत आहे़ मित्या अन् कारवाईच्या घोषणेचा केवळ दिखावा
विधानसभा निवडणुकीत परभणीत काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी काम केले होते़ पाथरीत काँग्रेसच्याच तिकीटावर निवडून येवून सत्ता भोगणाºया पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्याच विरोधात उघडपणे काम केले़ जिंतूरमध्ये राष्ट्रवादीच्याच काही लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या विरोधात काम केले़ येथील एकाही पदाधिकाºयावर पक्षाने कार्यवाही केली नाही़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ़ सुरेश वरपूडकर यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते़ राष्ट्रवादीने माजी आ़ जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कारवाईसाठी राज्यस्तरावर समिती स्थापन केली होती़ हा केवळ फुसका बार ठरला़ गंगाखेडमध्ये शिवसेनेच्या विरोधात भाजपाच्या नेते मंडळींनी व पाथरीत भाजपाच्या विरोधात शिवसेनेच्या काही नेत्यांनी काम केले होते़ आता ही युतीच फिसकटल्याने कारवाईचा विषयच राहिलेला नाही़

Web Title: Parbhani: Acceptance of inactivity to act on the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.