परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:19 AM2018-12-27T00:19:11+5:302018-12-27T00:19:19+5:30

राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़

Parbhani: 500 crore transactions have been made due to the strike | परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़
परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून दररोज लाखो रुपयांचा व्यवहार होतो़ बँक शाखा सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांची शाखेच्या समोर रांग लागते़ त्यामुळे बँकींग व्यवहारावरच जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल अवलंबून आहे़ बुधवारी बँकींग क्षेत्रात काम करणाºया अधिकारी, कर्मचाºयांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता़ या संपामध्ये युएफबीयू या संघटनेच्या बॅनरखाली बँकींग क्षेत्रातील इतर ९ संघटनाही संपात सहभागी झाल्या होत्या़
परभणी जिल्ह्यामध्ये विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या सुमारे ५६ शाखा आहेत. या सर्व शाखा बुधवारी बंद राहिल्या. बँकींग व्यवहारही पूर्णत: ठप्प झाले होते़ राष्ट्रीयकृत बॅकांच्या संपामुळे इतर आॅनलाईन व्यवहारावरही परिणाम झाला़ एनईएफटी, आरटीजीएस, धनादेशाद्वारे होणारे व्यवहार दिवसभरात ठप्प राहिले़ सर्वसाधारणपणे राष्ट्रीयकृत बँकांमधून दिवसाकाठी ५०० कोटी रुपयांचा व्यवहार होतो़ हा व्यवहार बुधवारी बंद राहिल्याचे पहावयास मिळाले़
पाचव्या दिवशीही कामकाज ठप्प
४जिल्ह्यात पाचव्या दिवशी बँकांचे कामकाज ठप्प राहिले़ २१ डिसेंबर रोजी राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी, कर्मचाºयांनी संप पुकारला होता़ २२ डिसेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहिल्या़ त्यानंतर २३ डिसेंबर रोजी रविवार, २४ डिसेंबर रोजीचा एक दिवस वगळता २५ रोजी नाताळची सुटी आणि २६ डिसेंबर रोजी पुन्हा संप झाल्याने ५ दिवस बँकींग कामकाज ठप्प राहिले़ विशेष म्हणजे, बुधवारी राष्ट्रीयकृत बँका वगळता इतर नागरी व सहकारी बँका सुरू असल्या तरी या बॅँकांचे व्यवहारही राष्ट्रीयकृत बँकेवर अवलंबून असल्याने नागरी, सहकारी बँकांच्या व्यवहारावरही परिणाम झाले़
या मागण्यांसाठी पुकारला संप
४युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने बुधवारी संप पुकारला़ फोरमच्या अधिकारी, पदाधिकाºयांनी स्टेट बँक आॅफ इंडिया स्टेडियम शाखेसमोर निदर्शने केली़ यावेळी परभणी शहर व परिसरातील सर्व सरकारी बँकांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ बँक आॅफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलनीकरणास विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला़
४तसेच कार्पोरेट सेक्टरच्या मोठ्या बुडीत कर्जाची वसुली करा, प्रलंबित असलेला वेतन करार लागू करावा, आदी मागण्या करण्यात आल्या़ यावेळी अधिकारी संघटनेचे डॉ़ सतीश टाके, मेश्राम, कर्मचारी संघटनेचे चंद्रकांत लोखंडे, भास्कर विभुते यांनी मार्गदर्शन केले़
४यावेळी अशोक पिल्लेवार, सुशील काकडे, शिवराम शेजूळकर, अशिष देवधर, कुलदीप देसाई यांच्यासह शहरातील राष्टÑीयकृत बँकांतील बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते़

Web Title: Parbhani: 500 crore transactions have been made due to the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.