परभणी :चित्रकला स्पर्धेत ४५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:45 IST2018-12-26T00:45:01+5:302018-12-26T00:45:45+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील म.फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

परभणी :चित्रकला स्पर्धेत ४५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील म.फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, कुलगुरु डॉ.अशोक ढवन, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, अॅड.अशोक सोनी, माजी आ.विजय गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, स्वराजसिंह परिहार, भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, गणेशराव रोकडे, श्रीनिवास मुंडे, बालाजी देसाई, लिंबाजी भोसले, किरण दैठणकर, शामसुंदर मुंडे, डी.एस. कदम आदींची उपस्थिती होती.
अजय गव्हाणे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.