Parbhani: 376 wild animals for wild animals | परभणी : ३७६ वन्य प्राण्यांसाठी २० पाणवठे
परभणी : ३७६ वन्य प्राण्यांसाठी २० पाणवठे

मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अवर्षण परिस्थितीत वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी येथील वन विभागाने जिल्ह्यातील जंगल भागात २० पाणवठे उभारले आहेत.
जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राण्यांचे स्थलांतर होण्याची शक्यता असते. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पशुगणना होते. ही गणना केवळ जंगल भागातीलच असते. गतवर्षी जंगल भागात ३७६ पशू आढळले होते. त्यात हरीण, काळवीट, मोर, लांडोर, तरस, नीलगाय, उदमांजर, रानडुक्कर, वानर इ. प्राण्यांचा समावेश होता. पशुगणनेत उपलब्ध झालेल्या प्राण्यांच्या संख्येनुसार वनविभाने दुष्काळात जंगलामध्ये २० पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती थांबली आहे.
परभणी जिल्ह्यातील पशूगणनेत आढळलेल्या पशूंची संख्या (जंगलातील)
बिबट्या 1
कोल्हा 15
हरीण 127
नीलगाय 200
काळवीट 200
वानर 500
मोर 9
१२ गावांच्या शिवारात वन्यक्षेत्र
परभणी जिल्ह्यात जिंतूर बिटातील केहाळ, सावळी, डिग्रस, इटोली, मोहखेड, टाकळखोपा, आरखेड, मानकेश्वर, सावरगाव, सावळी, चौधरणी, धारखेड आदी ठिकाणी जंगल क्षेत्र आहे. या भागात गायरान जमिनीवर पशुप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी २० कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. त्यामुळे दुष्काळातही वन्य प्राण्यांच्या पाण्याची सुविधा झाली आहे. या पाणवठ्यांची वनविभाकडून दररोज पाहणी केली जाते, अशी माहिती वनविभागीय अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.


Web Title: Parbhani: 376 wild animals for wild animals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.