परभणी : साडेगाव रस्त्यावर दारुचे ३५ बॉक्स पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:43 IST2019-02-23T00:42:35+5:302019-02-23T00:43:14+5:30
तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

परभणी : साडेगाव रस्त्यावर दारुचे ३५ बॉक्स पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी झरी- साडेगाव रस्त्यावर गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकून एम.एच.२२-यू.०८४४ ही क्रुझर जीप थांबविली. यावेळी या जीपमध्ये राजेभाऊ अंबादास खरात (३३, रा.टाकळी कुंभकर्ण), संतोष विठ्ठल वायभासे (२७, रा.धारणगाव), सुभाष राणोजी मुळे (३६, रा.धारणगाव) हे तिघे आढळून आले. जीपची तपासणी केली असता आतमध्ये देशी दारुचे ३५ बॉक्स आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरील दारुचे बॉक्स कुंभकर्ण खंदारे (रा.धारणगाव) याने टाकळी कुंभकर्ण येथील मोदी एजन्सीच्या गोडावूनमधून मॅनेजर गजानन याच्या मदतीने घेतले असल्याचे सांगितले. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सुनील गोपीनवार, बाळासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवाड, सय्यद मोबीन, सय्यद मोईन, दिलावर पठाण, भगवान भुसारे, विशाल वाघमारे, चालक रजाऊल्ला, अरुण कांबळे यांच्या पथकाने केली.