परभणी : विद्युत रोहित्रातील १ लाखाचे साहित्य चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:00 IST2019-03-06T00:00:12+5:302019-03-06T00:00:39+5:30
जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील वीज रोहित्रातील कॉईल, आॅईल आणि विजेची तार असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना ४ मार्च रोजी रात्री घडली़ या प्रकारामुळे मंगळवारी उशिरापर्यंत जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प पडला होता़

परभणी : विद्युत रोहित्रातील १ लाखाचे साहित्य चोरीला
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी) : जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील वीज रोहित्रातील कॉईल, आॅईल आणि विजेची तार असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना ४ मार्च रोजी रात्री घडली़ या प्रकारामुळे मंगळवारी उशिरापर्यंत जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प पडला होता़
येलदरी धरणाच्या खाली पूर्णा नदीपात्रात जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी विद्युत रोहित्र उभारले आहे़ २०० केव्ही क्षमतेचे हे विद्युत रोहित्र आहे़ चोरट्यांनी या रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून या रोहित्रातील मुख्य कॉईल आणि आॅईल काढून घेतले़ सुमारे १ लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे़ या घटनेची माहिती मिळताच कपील फारुखी, नगर अभियंता व्ही़ए़ आडसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए़एल़ शेख, बीट जमादार, पांडूरंग तुपसुंदर, बडे, पी़आऱ तिथे आदींनी घटनास्थळी भेट दिली़ ४ मार्च रोजी चोरीच्या घटनेमुळे जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे़ मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हा पाणीपुरवठा सुरू होईल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले़
जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेवर विद्युत रोहित्र बसविले असून, शहरासाठी येथील वीज मोटार २४ तास सुरू ठेवावी लागते़
त्यामुळे दोन आॅपरेटर कायमस्वरुपी कर्तव्यावर असतात, असे असतानाही मुख्य फिडरवरील वीज पुरवठा बंद करून चोरट्यांनी ही चोरी केली़