Parabhani ZP Result 2026: जिल्ह्यात भाजपने मारली मुसंडी: स्वबळावर सत्तेकडे वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:41 IST2026-02-09T13:40:50+5:302026-02-09T13:41:12+5:30
परभणी : जिल्ह्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्तेकडे वाटचाल सुरू केली आहे. सध्या मतमोजणी सुरू असलेल्या ४६ ...

Parabhani ZP Result 2026: जिल्ह्यात भाजपने मारली मुसंडी: स्वबळावर सत्तेकडे वाटचाल
परभणी : जिल्ह्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्तेकडे वाटचाल सुरू केली आहे. सध्या मतमोजणी सुरू असलेल्या ४६ जागांपैकी २० ठिकाणी भाजपने आघाडी घेत मुसंडी मारली आहे.
परभणीत राष्ट्रवादीची सत्ता खेचण्यात भाजपला यश मिळते की काय? अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपने तब्बल २० जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी १० जागांचे तर त्यांच्या बाजूने निकालही घोषित झाले आहेत. राष्ट्रवादी १२ जागांवर आघाडी घेत दुसऱ्या स्थानी असून त्यांचेही यापैकी ८ जण विजयी घोषित झाले आहेत. उद्धवसेनेचे व शिंदेसेनेचे प्रत्येकी ५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेस ३ जागांच्या पुढे जाण्याची शक्यता माळवली आहे. एका जागेवर अपक्ष पुढे आहे.
अशा आहेत जागा आघाडीवर
भाजप २०
राष्ट्रवादी अ.प. १२
उद्धवसेना ५
शिंदेसेना ५
काँग्रेस ३
अपक्ष १