अवघ्या २२ व्या वर्षी उद्धवसेनेच्या प्रतीक्षा जयस्वालांची परभणी जिल्हा परिषदेमध्ये एन्ट्री! भाजपचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:28 IST2026-02-09T12:26:34+5:302026-02-09T12:28:40+5:30

Parabhani ZP Election Result 2026: तरुणाईची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री! प्रतीक्षा जयस्वाल यांनी भाजप उमेदवाराला पाजलं पराभवाचं पाणी.

Parabhani ZP Election Result 2026: Pratiksha Jaiswal in Parbhani Zilla Parishad at just 22 years old; Uddhav Sena's saffron flag flutters in Takli Kumbhakarna | अवघ्या २२ व्या वर्षी उद्धवसेनेच्या प्रतीक्षा जयस्वालांची परभणी जिल्हा परिषदेमध्ये एन्ट्री! भाजपचा पराभव

अवघ्या २२ व्या वर्षी उद्धवसेनेच्या प्रतीक्षा जयस्वालांची परभणी जिल्हा परिषदेमध्ये एन्ट्री! भाजपचा पराभव

- मारोती जुमडे

परभणी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत परभणीकरांनी यंदा घराणेशाहीपेक्षा युवा नेतृत्वाला अधिक पसंती दिली आहे. टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटातून उद्धवसेनेच्या युवा उमेदवार प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. अवघ्या २२ व्या वर्षी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाऊल ठेवणारी प्रतीक्षा ही जिल्ह्याच्या राजकारणातील नवा आणि सर्वात तरुण चेहरा ठरली आहे.

विजयी आकडेवारी आणि चुरस 
टाकळी कुंभकर्ण गटात दुसऱ्या फेरीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली. प्रतीक्षा जयस्वाल यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती. त्यांना एकूण ३,४१३ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या अश्विनी देशमुख यांना २,६२९ मते पडली. जयस्वाल यांनी ७८४ मतांच्या फरकाने भाजपला पराभवाचा धक्का दिला आहे.

पंचायत समिती गणातही उद्धवसेनेची सरशी 
जिल्हा परिषदेसोबतच याच सर्कलच्या पंचायत समिती गणातही उद्धवसेनेने बाजी मारली आहे. तानाजी भाऊराव कदम यांनी १,६८५ मते मिळवून मंचक सामाले (१,४०० मते) यांचा २८५ मतांनी पराभव केला. तर नांदापूर पंचायत समिती गणात विवेक बाळासाहेब रसाळ यांनी चुरशीच्या लढतीत २६२ मतांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.

प्रतीक्षाचे सर्वत्र कौतुक!
या दुहेरी विजयामुळे टाकळी कुंभकर्ण परिसरात उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. एका २२ वर्षांच्या तरुणीने दाखवलेल्या या धाडसामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे.

Web Title : 22 वर्षीय प्रतीक्षा जयसवाल ने परभणी जिला परिषद में प्रवेश किया, उद्धव सेना की जीत!

Web Summary : उद्धव सेना की 22 वर्षीय प्रतीक्षा जयसवाल ने भाजपा को हराकर टाकली कुंभकर्ण जिला परिषद सीट जीती। पंचायत समिति में भी उद्धव सेना जीती। उनके युवा नेतृत्व की सराहना हो रही है।

Web Title : 22-Year-Old Pratiksha Jaiswal Enters Parbhani Zilla Parishad, Uddhav Sena Victory!

Web Summary : Pratiksha Jaiswal, 22, of Uddhav Sena, won the Takli Kumbhakarna Zilla Parishad seat, defeating BJP. Uddhav Sena also won in Panchayat Samiti. Her youth leadership is celebrated.