Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ

By मारोती जुंबडे | Updated: June 17, 2025 18:26 IST2025-06-17T18:25:36+5:302025-06-17T18:26:22+5:30

याप्रकरणी चार जणांविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Parabhani: Sand mafia's atrocities; Women Mandal officials and Talathi were abused | Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ

Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ

परभणी : वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत कारवाईसाठी गेलेल्या मंडळ अधिकारी व तलाठ्याला ट्रॅक्टर मालक आणि त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता सेलू तालूक्यातील मोरेगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली सेलू पोलिसात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सारिका शंकरराव हेडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हेडगे या कुपटा मंडळ विभाग येथे मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असून त्या १६ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तलाठी दीपक गांगुर्डे यांच्यासह कारवाईसाठी मोरेगाव ते देगाव फाट्याच्या मार्गावर गेल्या. त्यांना वाळू भरलेले ट्रॅक्टर आढळून आले. त्यांनी थांबवून तपासणी केली असता ट्रॅक्टर चालक पळून गेला. गाडीत अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टर सोबत असलेल्या ओम खेडेकर याने गाडी मालकाचे नाव राजू अरोरा असल्याचे सांगितले. पुढे चालकास बोलावण्यात आले असता त्याने ट्रॅक्टर घेऊन तेथून पलायन केले. 

त्यानंतर काही वेळात एक वाहन घटनास्थळी आले. त्यातून निखिल पहाडे व वैभव खेडेकर हे उतरून आले. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून, तुम्हाला आमचंच ट्रॅक्टर दिसलं का? असे म्हणत आरडाओरड केली. तसेच तुमची पाहतोत असे म्हणत धमकीही दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी सारिका हेडगे यांनी राजू अरोरा, ओम खेडेकर, निखिल पहाडे व वैभव खेडेकर यांच्याविरोधात कलम १३२, २९६,३५१(२)(३), ३०३(२), ३(५) भा.दं.वि. आणि म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम ४८(७)(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Parabhani: Sand mafia's atrocities; Women Mandal officials and Talathi were abused