शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: कारवरील ताबा सुटल्याने धडकेत ४ मित्रांचा जागीच मृत्यू; अपघातानंतर चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:13 IST

उज्जैन दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा अपघाती मृत्यू ; जिंतूर तालुक्यातील अकोली पुलावरील घटना

जिंतूर (जि. परभणी): देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा परभणी - जिंतूर मार्गावरील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गंगाखेड, जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे.

बालाजी आश्रोबा औटी (२८, रा. खडकपुरा), बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (३०, रा. तारुमोहल्ला) कृष्णा बालाजी गुट्टे (२८, रा. कोद्री रोड), रोहन संजय राठोर (२७, रा. लक्ष्मीनगर) अशी मयतांची नावे आहेत. तर गोपाळ गणेश रोकडे (२८, रा. खडकपुरा) गंभीर जखमी झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील पाच भाविक कार (क्र. एमएच १४ केएफ २७९०) गंगाखेडहून जिंतूरमार्गे उज्जैन येथे देवदर्शनासाठी जात होते. जिंतूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील अकोली पुलाजवळ येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. घुगे व चालक पवार यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर व रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी तपासणी केल्यानंतर बालाजी औटी, बालाप्रसाद घोरपडे, कृष्णा गुट्टे, रोहन राठोर या चौघांना मृत घोषित केले, तर गोपाळ रोकडे गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ऐन तारुण्यात चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गंगाखेड शहरात शोककळा पसरली आहे.

चालक घटनास्थळावरून पसारअपघात घडताच वाहनचालक अभिजित शिंगाडे (रा. धनगरमोहा, ता. गंगाखेड) हा घटनास्थळावरून पसार झाला. बीट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि विजय जाधव करीत आहेत.

अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणीघटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बीट जमादार दत्तात्रेय गुंगाणे, मेजर थोरवे व पोलिस वाहनचालक पैठणे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घटनास्थळी व रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Car accident kills four friends; driver flees scene.

Web Summary : Four friends died and one was injured in a car accident near Akoli bridge in Parbhani district. The driver lost control of the vehicle. The driver fled the scene; police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी