Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:28 IST2025-10-09T13:28:16+5:302025-10-09T13:28:39+5:30
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींची कारागृहात रवानगी

Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव
सेलू (जि. परभणी) : सेलूतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा घडल्यानंतर सेलू पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकासह दोघांची कारागृहात तर विधीसंघर्सग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी संबंधित शाळेच्या शालेय समिती व्यवस्थापन बैठकीत आरोपी शिक्षकाच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
सेलूतील अत्याचार घटनेप्रकरणी संतोष मलसवाड, नितीन परदेशी या दोघांची मंगळवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर विशेष जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे हजर केले असता, न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली. तर पोलिसांच्या ताब्यातील विधी संघर्षग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी केली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
संस्थेकडून आरोपी शिक्षकाचा निलंबन ठराव मंजूर
नूतन विद्यालय, सेलू यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. संस्थेमधील सहशिक्षक संतोष मलसटवाड यास सेलू पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्ह्यासाठी अटक केली. अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाल्यानंतर बुधवारी शालेय समितीची बैठक संस्थाध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत शिक्षक संतोष मलसटवाडवरील आरोप आणि अटक प्रकरणाचा आढावा घेऊन एकमताने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले, असा ठराव मंजूर करण्यात आला.