Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:27 IST2025-06-09T14:27:15+5:302025-06-09T14:27:40+5:30

गंगाखेड तालुक्यातील बनवाडी शिवारातील घटना

Parabhani: Private worker dies after falling from pole while restoring power supply | Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

गंगाखेड ( परभणी): तालुक्यातील बनवाडी शिवारात विद्युत प्रवाह सुरळीत करताना खाजगी कामगाराचा खांबावरून पडून मृत्यू झाल्याची घटना बनवाडी शिवारात रविवारी (दि.8) दुपारी घडली आहे. ज्ञानोबा विठ्ठलराव फड (वय 35 वर्षे, रा. बोर्डा) असे मयत कामगाराचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हरंगुळ, शेंडगा, मानकादेवी गाव परिसरातील विद्युत प्रवाह बनवाडी शिवारात बिघाड झाल्याने खंडित झाला होता. येथे दुरुस्ती करण्यासाठी रविवारी दुपारी महावितरणचे लाईनमन विनोद फड आले होते. त्यांच्यासोबत ज्ञानोबा विठ्ठलराव फड हे कामगार देखील होते. दुरुस्तीसाठी कामगार ज्ञानोबा फंड खांबावर चढले. मात्र, अचानक खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत मयत घोषित केले. 

माहिती कळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मयत ज्ञानोबा फड यांच्या पश्चात एक मुलगा, आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Parabhani: Private worker dies after falling from pole while restoring power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.