Parabhani: भरदिवसा घरफोडीने पाथरी हादरले; १५ लाखांचे दागिने, १ लाखाची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:42 IST2025-06-12T18:41:17+5:302025-06-12T18:42:12+5:30

घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूने कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

Parabhani: Pathri shocked by daylight burglary; Jewelry worth 15 lakhs, cash worth 1 lakh looted | Parabhani: भरदिवसा घरफोडीने पाथरी हादरले; १५ लाखांचे दागिने, १ लाखाची रोकड लंपास

Parabhani: भरदिवसा घरफोडीने पाथरी हादरले; १५ लाखांचे दागिने, १ लाखाची रोकड लंपास

पाथरी ( परभणी) : शहरातील माळीवाडा भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण १६ लाखांचा ऐवज लंपास केला. ही धक्कादायक घटना १२ जून रोजी दुपारी २.३० वाजता घडली.

शहरातील माळीवाडा येथील साहेबराव मनोलीकर यांच्या माळीवाडा येथील घरी ही चोरी झाली. माळीवाडा येथील त्यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब तिकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाट फोडून मोठ्या प्रमाणात दागिने व रोख रक्कम लंपास केली, अशी माहिती साहेबराव मनोलीकर यांनी दिली 

घटनेची माहिती समजताच पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी डॉगस्कॉड ला पाचारण केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार १५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. भर दिवस घरफोडी झाल्याने नागरिकांत भीतीचं वातावरण पसरले असून सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Parabhani: Pathri shocked by daylight burglary; Jewelry worth 15 lakhs, cash worth 1 lakh looted