परभणीत स्थानिक गुन्हे शाखेने चार लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 19:46 IST2019-03-19T19:45:55+5:302019-03-19T19:46:00+5:30

शहरात गुटख्याची चोरून विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली़

Parabhani local crime branch seized four lakh's gutkha | परभणीत स्थानिक गुन्हे शाखेने चार लाखांचा गुटखा पकडला

परभणीत स्थानिक गुन्हे शाखेने चार लाखांचा गुटखा पकडला

परभणी- शहरातील कडबी मंडी भागातील एका घरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१९)  सकाळी ३ लाख ९९ हजार ९८ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ 

सुगंधित तंबाखू आणि गुटखा, पान मसाल्याच्या विक्रीला राज्यात बंदी आहे़ असे असताना शहरात गुटख्याची चोरून विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली़ या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी सकाळी कडबी मंडी, कालाबावर परिसरात छापा टाकला़ त्यावेळी शेख समीर शेख बशीर यांच्या घरात गुटख्याचा मोठा साठा पोलिसांना आढळला़ पोलिसांनी या गुटख्याची मोजदाद केली असता, ३ लाख ९९ हजार ९८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला़ पोलिसांनी आरोपीस अटक केली.

याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, अनिल हिंगोले, आशा सावंत, लक्ष्मीकांत धृतराज, दिलावर खान, सय्यद मोईन, शिंदे, कांबळे आदींनी केली़

Web Title: Parabhani local crime branch seized four lakh's gutkha