शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:13 IST

या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

परभणी : सेलू तालुक्यात तेलंगणा राज्यातून आणलेल्या २८ मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना मागील चार महिन्यांपासून कामाला लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात आर. बी. कन्ट्रक्शनच्या प्राधिकृत अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सामाजिक कार्यकर्ता तथा असंघटित कामगारांचे विशेष सेल, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण बीडचे सदस्य तत्त्वशील बाबूराव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार तेलंगणा राज्यातील सामाजिक कार्यकर्ता रामलिंग बिक्षम मंडडी यांनी संपर्क साधून तेलंगणातील काही मजुरांना नांदगाव शेत-शिवार (ता. सेलू) येथे वेठबिगार मजूर म्हणून ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा विधिसेवा प्राधिकरण परभणीच्या सूचनेनुसार चारठाणा, जिंतूर पोलिस, नायब तहसीलदार व महसूल प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. मजुरांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली असता, जास्त मजुरीचे आमिष दाखवून तेलंगणातून महाराष्ट्रात आणल्याचे, तसेच ठरलेल्या कामापेक्षा अधिक काम करून घेतले जात असल्याचे आणि मजुरीचे पैसे कमी दिले जात असल्याचे मजुरांनी सांगितले. या मजुरांना बाबासाहेब काकडे (आर. बी. कन्ट्रक्शनचे प्राधिकृत अधिकारी), भुसाबागा येरेया, मित्तेकृष्णया व एकतापू पैतया या ठेकेदारांनी कामावर लावल्याचे पुढे आले. प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षितरीत्या चारठाणा पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाने सर्व मजुरांना शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षितरीत्या चारठाणा पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी दळवे करीत आहेत.

जिल्हा न्यायाधीशांनी साधला संवादसेलू तालुक्यातील नांदगाव शेतशिवारात वेठबिगारीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेनंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांनी सुटका करण्यात आलेल्या कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना कायदेशीर संरक्षणाबाबत दिलासा दिला. कामगारांनी वेठबिगारी दरम्यान भोगलेल्या हालअपेष्टा व मानसिक त्रास याबाबत आपली आपबीती मांडली. जिल्हा न्यायाधीशांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेत कायदा तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही दबावाला बळी पडू नका, असा विश्वास दिला. यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव भूषण काळे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Forced Labor Exposed; 28 Laborers, 10 Children Rescued in Selu

Web Summary : 28 laborers, including 10 children from Telangana, were rescued from forced labor in Selu, Parbhani. Four individuals face charges. Victims were lured with high wages but exploited. A legal process has begun, and authorities are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीSocialसामाजिक