परभणीत लाचखोर हवालदार एसीबीच्या कचाट्यात; ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले

By राजन मगरुळकर | Updated: March 7, 2026 13:55 IST2026-03-07T13:54:24+5:302026-03-07T13:55:18+5:30

तक्रारीवर कारवाई करण्यासाठी मागितली लाच; हवालदार अटकेत.

Parabhani Crime: Bribe-taking constable in Parbhani caught by ACB; caught red-handed while accepting Rs 8,000 | परभणीत लाचखोर हवालदार एसीबीच्या कचाट्यात; ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले

परभणीत लाचखोर हवालदार एसीबीच्या कचाट्यात; ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले

परभणी : तक्रारदाराच्या मुलीने सोनपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली, हे विचारण्यास गेले असता पोलिस हवालदार भगवान मुंढे यांनी आरोपीवर पावबंद करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी केली होती. पडताळणीनंतर शुक्रवारी गंगाखेड-परळी मार्गावर निळा फाटा येथे सापळा कारवाईत पोलिस हवालदाराने आठ हजारांची लाच स्वीकारली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागपरभणीच्या पथकाने केली.

भगवान विठ्ठल मुंढे (५४, पोलिस हवालदार, नेमणूक सोनपेठ पोलीस ठाणे) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. गोशाळा चालवण्याचा व्यवसाय तक्रारदार करतात. त्यांची मुलगी गो-शाळेत हजर असताना काही इसमांनी शाळेत येऊन दीड वर्षांपूर्वी गाय व दोन वासरे सोडली होती. ती परत द्या, असे म्हणून मुलीस शिवीगाळ करीत गाय वासरे घेऊन गेले. याबाबत तक्रारदार यांच्या मुलीने पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. तक्रारी अर्ज बीट जमादार भगवान मुंढे यांच्याकडे चौकशी करीता देण्यात आला होता. या अर्जावर काय कारवाई केली, हे विचारण्यासाठी तक्रारदार गेले असता जमादार मुंढे यांनी अर्जावर मी कारवाई करतो, पण त्यासाठी मला तुम्ही दहा हजार रुपये द्या, अशी लाच मागणी केली. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने २५ फेब्रुवारीला परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्वलक्ष्मी रसवंतीगृह येथे केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान हवालदार मुंढे यांनी दहा हजाराची मागणी केली. तक्रारदाराने तडजोड अंती आठ हजार रुपये देतो म्हटले असता हवालदार मुंढे यांनी आठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली. या प्रकरणात शुक्रवारी विश्वलक्ष्मी रसवंतीगृह निळा फाटा येथे सापळा कारवाई करण्यात आली. बीट जमादार भगवान मुंढे यांनी पंचासमक्ष आठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली.

आरोपीची प्रकृती बिघडली...
सापळा कारवाईनंतर पुढील प्रक्रियेत मोबाईल जप्ती तसेच आरोपीची अंगझडती घेण्यात आली. यामध्ये आरोपी लोकसेवक भगवान मुंढे यांच्याकडे एक मोबाईल, एक वॉलेट, पोलिस ओळखपत्र, मतदान कार्ड आणि रोख रक्कम ६५० रुपये मिळून आले. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीची प्रकृती यानंतर बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी रेफर केल्याने त्याच्या नातेवाईकांना सूचनापत्र देऊन नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आले. ही सापळा कारवाई पोलिस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक मनीषा पवार आणि पथकाने केली. सरकार पक्षातर्फे पोलिस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी सोनपेठ ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title : परभणी: रिश्वत लेते रंगे हाथों पकड़ा गया पुलिसकर्मी, ₹8,000 बरामद

Web Summary : परभणी में एक पुलिस कांस्टेबल को शिकायत पर कार्रवाई करने के लिए ₹8,000 रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। भगवान मुंढे ने शिकायतकर्ता से पैसे की मांग की थी जिसकी बेटी ने मामला दर्ज कराया था। एसीबी ने जाल बिछाकर उसे पकड़ा। गिरफ्तारी के बाद उसकी तबीयत बिगड़ गई।

Web Title : Parbhani: Policeman Caught Red-Handed Accepting Bribe of ₹8,000

Web Summary : A police constable in Parbhani was arrested accepting ₹8,000 bribe for acting on a complaint. ভগবান मुंढे demanded money from a complainant whose daughter had filed a case. ACB laid a trap and caught him. His health deteriorated post-arrest.