Parabhani: बोरी गावामध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ; पंधरा ठिकाणी चोरीचा प्रयत्न, एक घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:11 IST2025-08-22T16:10:56+5:302025-08-22T16:11:17+5:30
चोरट्यांनी गावातील पेट गल्लीतून प्रवेश केला पेठ गल्लीतील काही घरांचे कडे तोडून चोरीचा प्रयत्न केला.

Parabhani: बोरी गावामध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ; पंधरा ठिकाणी चोरीचा प्रयत्न, एक घरफोडी
- तुकाराम सर्जे
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी गावामध्ये २१ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांच्या चड्डी गँगने धूमाकूळ घातला. यात गावातील दहा ते १५ ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांना जाग आल्यानंतर चोरट्यांनी पयालन केले. तरी एका घरामध्ये चोरी करून या गँगने तीन ते चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही गँग गावातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
चोरट्यांनी गावातील पेट गल्लीतून प्रवेश केला पेठ गल्लीतील काही घरांचे कडे तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी चोरी होऊ शकली नाही. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा माळी गल्ली तसेच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची झटापट केली. त्यानंतर अनिल वसेकर यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील व डब्यातील सहा तोळे सोने व चांदी, नगदी ५० हजार असा ऐवज लंपास केला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी सकाळी ठसे पथक व एलसीबीचे पोलीस अधिकारी व बोरी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक एस.एन.थोरवे व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.हे चोरटे फिरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सहा ते सात चोरटे चड्डीवर गावभर फिरत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.