आयडीएसएसएमटी योजनेंतर्गत परभणी शहराला मंजूर झालेली नवीन पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण झाली नसल्याने केंद्राच्याच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव रेंगाळल्याची बाब समोर आली आहे़ ...
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...
सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव ...
मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्क्यावरून १ हजार ४८० ब्रास वाळुचा अधिक उपसा झाल्याची बाब ईटीएस मोजमापात उघड झाली असून, भूमिलेखच्या अधीक्षकांनी तसा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे़ ...
परभणी शहराचा बाह्यवळण रस्ता : भूसंपादन विभाग लागला कामाला;आठवडाभरात जमीन संपादनलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू होणार असून, सद्यस्थितीला संपादि ...
खोट्या सही द्वारे बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दोन टंकलेखन संस्था चालकाविरूध्द गटशिक्षणाधिकारी ससाणे यांच्या तक्रारीवरुन मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...
गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारलेल्या पुलाला खालील बाजुने तडे गेले असून, अनेक ठिकाणी गज उघडे पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़ ...
शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची निरीक्षणे नोंदविली असून, त्यात २० गावांमधील भूजल पातळी मोठ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावण्याची शक्यता आहे. ...