जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़ ...
यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़ ...
परभणी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा काढला. आज सलग 15 व्या दिवशी पेट्रोल , डिझेलच्या किमतीत वाढ झालीय. त्याविरोधात ... ...
तालुक्यातील गौंडगाव व मैराळ सावंगी येथील वाळू धक्क्यावरून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत दोन हायवा ट्रक आणि तीन जेसीबी मशीन जप्त केल्या आहेत़ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ ...
परभणी रेल्वेस्थानकावरून धावणारी निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वे गाडी एक महिन्यासाठी रद्द केल्याने पंढरपूरसह परळी, गंगाखेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे़ ...
किटक नाशके व इतर पदार्थामधून विषबाधा झालेल्या ६६३ रुग्णांनी मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यापैकी ६२० रुग्णांना जीवदान मिळाले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य वेळी उपचार झाल्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले आहेत़ ...
कौटुंबिक वादातून एका महिलेचा २१ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बामणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता उन्हाबरोबरच उकाड्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. ...
नागरी स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ८ शौचालये पाणी नसल्याने बंद पडली आहेत. बोअर आटल्याने या शौचालयांना चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या असून या शिक्षकांना रुजू होण्यासाठी तातडीने कार्यमुक्तही करण्यात आले आहे. ...