पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या डिझेल टँकरच्या चालकाला तलवारीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वाºयासह पावसाने वीज वितरण कंपनीचे २ कोटी ९६ लाख २० हजार २८८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे कृषीपंपधारकांसह घरगुती ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ...
विविध शासकीय यंत्रणांमार्फत जिल्ह्यात पायाभूत विकासाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक विकास साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला मंजूर झालेल्या १५२ कोटी २९ लाख रुपयांपैकी ७० टक्के रक्कम १२० कोटी ५८ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ या निधीतून ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील घरकुल आवास लाभार्थी मोठ्या तयारीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र वेळेअभावी या लाभार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. ...
जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२ कोटी १२ लाख रुपयांपैकी ४१ कोटी ९६ लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ...