जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़ ...
शासनाने गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली़ या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी सूचना केल्या़ ...
ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोअरवेलच्या गाडीला जोराची धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. ही घटना २४ आॅक्टोबर रोजी पहाटे सोनपेठ फाट्यावर घडली. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या कृषी विभागाच्या सहसचिवांनी दिले आहेत़ यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वित्तीय सल्लागारांची एक सदस्यीय समिती निय ...
परभणी शहराबरोबरच पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी सिद्धेश्वर आणि निम्न दूधना प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे़ निम्न दूधना प्रकल्पात १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये ३० दलघमी पाणी या दोन शहरांसाठ ...
मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणीतील शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. ...
ग्रामीण भागातील खेळाडुंना क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविण्यासाठी ‘तालुका तिथे क्रीडा संकुलन’ हे शासनाचे धोरण असताना सार्वजनिक बांधकाम व कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे पूर्णा येथील तालुकास्तरीय क्रीडा संकुलनाचे काम मागील चार वर्षापासून कासवगतीने सुरू ...
अहमदाबाद येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेतील कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले. ...
साधारणत: एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य आणि विषाणूजन्य तापीचा फैलाव झाला असून, रुग्णांच्या संख्येतही कैक पटीने वाढ होत चालली आहे़ जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय रुग्णांनी फुल्ल झाले असून, आरोग्य विभागाच्या उपाययोजना मात्र तोकड्या ...