परभणी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता खा.संजय जाधव यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ...
घरकुल बांधकामाचे खोदकाम करीत असताना मानवी सापळा आढळल्याचा प्रकार सेलू शहरातील वालूरनाका येथील पारधीवाड्यात २४ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने तालुक्यातील ७० पाण्याचे नमूने तपासले असून त्यापैकी १२ गावांतील १८ नमूने दुषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. ...
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे. ...
वाळूघाटाच्या लिलावासंदर्भात शासनाचे २०१९ चे नवीन धोरण जाहीर झाले नसल्याने जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया पुन्हा एकदा ठप्प पडली आहे. आता या लिलावासाठी शासनाच्या धोरणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
परभणी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार पार पडली. मतमोजणी दरम्यान प्रशासकीय दिरंगाईमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची काहीशी धांदल झाल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाने पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे धावपळीत भर पडली. ...
हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजया ...
एक्झिट पोलचे अंदाज व मतदारांचा वाढता कल पाहून जिंकण्याचा आत्मविश्वास उराशी बाळगणाऱ्या राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाला १७ व्या लोकसभा निवडणुकीत गुरुवारी पराभव पत्कारावा लागला. ...
परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल १२ तास चालली़ सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ८ वाजता शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर संपली़ ...