मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजूर शहरी भागाकडे स्थलांतर करीत आहेत़ ...
कृषी प्रधान देशात शेतीसाठी लागणाऱ्या स्वस्त आणि सुटसुटीत कृषीपंपापासून ते सैन्यामध्ये शत्रूच्या हातातील शस्त्र म्हणून ओळखणाºया रोबोटच्या निर्मितीचे प्रयोग सादर करून जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचे दर्शन घडविले आहे़ ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली़ या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून गेला़ ...
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात परभणी जिल्ह्याला स्थान मिळेल, अशी जिल्हावासियांनी बाळगलेली अपेक्षा फोल ठरली असून, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी परभणीला कात्रजचा घाट दाखविला आहे़ ...
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानापोटी दोन टप्प्यात २७८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने हा निधी बँकांकड ...
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने वर्षभरात नियम मोडणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यातून ९० लाख १८ हजार रुपयांचा दंड शासन जमा केल्याची माहिती या शाखेच्या वतीने देण्यात आली. ...
अवैध वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
जालना ते नगरसोल या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या डेमू रेल्वेच्या दुरुस्तीची कामे आता पूर्णा रेल्वे स्थानक परिसरात नव्याने स्थापन केलेल्या वर्कशॉपमध्ये होणार आहे. त्यामुळे पूर्णा रेल्वेस्थानकाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
शहरातील कटारे हनुमान मंदिरात नूतन वर्षाचे स्वागत हनुमान चालिसाचे पठण करुन केले जाते. गेल्या आठ वर्षापासून नियमितपणे येथील युवकांनी हा उपक्रम राबविला असून यावर्षीही हनुमान चालिसाचे पठण करून नववर्ष स्वागत करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. ...