परभणी : हनुमान चालिसा पठणाने केले जाते नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:42 PM2019-12-28T23:42:20+5:302019-12-28T23:42:58+5:30

शहरातील कटारे हनुमान मंदिरात नूतन वर्षाचे स्वागत हनुमान चालिसाचे पठण करुन केले जाते. गेल्या आठ वर्षापासून नियमितपणे येथील युवकांनी हा उपक्रम राबविला असून यावर्षीही हनुमान चालिसाचे पठण करून नववर्ष स्वागत करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

Parbhani: Hanuman Chalisa Pathan welcomes New Year | परभणी : हनुमान चालिसा पठणाने केले जाते नववर्षाचे स्वागत

परभणी : हनुमान चालिसा पठणाने केले जाते नववर्षाचे स्वागत

Next

सत्यशील धबडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): शहरातील कटारे हनुमान मंदिरात नूतन वर्षाचे स्वागत हनुमान चालिसाचे पठण करुन केले जाते. गेल्या आठ वर्षापासून नियमितपणे येथील युवकांनी हा उपक्रम राबविला असून यावर्षीही हनुमान चालिसाचे पठण करून नववर्ष स्वागत करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
नूतन वर्षे जवळ आले की, बहुतांश ठिकाणी अनाठायी खर्च केला जातो. खर्चिक पद्धतीने बहुतांश ठिकाणी स्वागतही केले जाते. ही प्रथा मोडीत काढून मानवत शहरातील कटारे हनुमान मंदिरात १०८ हनुमान चालिसाचे पठण करुन अनाठायी खर्चाला फाटा दिला गेला आहे. हनुमान चालीसा पठण करण्याचे हे आठवे वर्षे आहे. २०१९ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२० या वर्षाचे स्वागत करण्यासाठी संयोजकांनी याची तयारीही सुरु केली आहे. ३१ डिसेबर हा दिवस जवळ येऊ लागताच नवीन वर्षाचे जंगी स्वागत करायचे, असे प्रत्येकाचा विचार असतो. जुन्या वर्षाला निरोप देवून नूतन वर्षाचे स्वागत प्रत्येक जण करतो. याशिवाय नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोणी थंड हवेचे ठिकाण निवडते तर कोणी वेगवेगळ्या पार्ट्याचे आयोजन करते. कोणी अलीशान हॉटेलमध्ये जातात तर कोणी घरीच टी. व्ही. वरील वेगवेगळ्े कार्यक्रम पाहत आपला आनंद व्यक्त करतात. कोणी मित्रांना भेटण्यासाठी हीच संधी म्हणून घरगुती कार्यक्रमाचेही आयोजनही करतात.
दरवर्षी खर्चिक बाबींना फाटा देत गेल्या आठ वर्षापासून शहारातील सांस्कृतीक सभागृहाच्या बाजुला असलेल्या कटारे हानुमान मंदिरात श्रीराम भक्त हानुमानाची स्तुती करत १०८ हानुमान चालिसाचे पठन केले जाते. यानंतर श्रीराम, हनुमान यांचा जयघोष करीत नूतन वर्षाचे स्वागत करण्यात येते. दरवर्षी ३१ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता हनुमान चालिसा पठनाला सुरवात होते. रात्री बारा वाजेपर्यंत चालिसा पठन करण्यात येते. हनुमान चालीसा वाचन करतेवेळी परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होते. या उपक्रमात लहान मुले, वृद्ध, महिला सर्वजण सहभागी होऊन यात तल्लीन होतात. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या दरवर्षी वाढत आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांसाठी अल्पोहाराची सोय मंदिर संयोजकाच्या वतीने करण्यात येते. इतर ठिकाणी धागंडधिगा घालणाऱ्या तरुणांनी या उपक्रमातून काहीतरी बोध घ्यावा, असा हा आदर्श कार्यक्रम आहे. धार्मिक पद्धतीने नूतन वर्षाचे स्वागत होत असल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करावा नववर्षारंभ
४बहुतांश ठिकाणी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे; परंतु, येथे मात्र त्यास थारा दिला जात नाही. नूतन वर्षाचे स्वागत सामाजिक भान ठेवून केले जाते. दरवर्षी नूतन वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप म्हटले की, रात्रभर धांगडधिंगा सुरु असतो; परंतु, हे सर्व बाजूला ठेवून येथील युवकांनी धार्मिकता जवळ केली आहे. सर्व लहान-थोर यात सहभागी होऊन आनंद व्यक्त करतात. याचबरोबर नवीन वर्षाची देवाण-घेवाणही या निमित्ताने होत असते. नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि सरत्या वर्षांच्या रात्री सर्वजण एकत्र येतात. जुन्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचे स्वागत करत ‘सेलीब्रेशन’ गैर नाही; परंतु, यातून दुसºयाला त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी. कटारे हनुमान मंदिरात भक्तीमय रुपाने होणारे नूतन वर्षाचे स्वागत हे वर्षभर प्रेरणादायी आहे.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमात आम्ही दरवर्षी सहभागी होत असतो. नूतन वर्षाचे स्वागत करताना आपण एखादा संकल्प केला पाहिजे. आपल्या संकल्पनाला अशा उपक्रमाची जोड मिळाल्यास आपले नूतन वर्ष निश्चितच चांगले जाईल. याशिवाय आशा उपक्रमामुळे समाजात चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
-गोविंद राठी, माजी संचालक कृउबा, मानवत

Web Title: Parbhani: Hanuman Chalisa Pathan welcomes New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.