आंबेटाकळी येथील ज्ञानेश्वर गोपीनाथराव बेले या तरुणास ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या भावकीतील नंदू रोहिदास बेले याने त्याच्या जवळील मोबाइल मागितला. ज्ञानेश्वरने मोबाइल देण्यास नकार दिला. ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास ज्ञानेश्वर हा शेतातून घरी येत असताना आरोपी नंदू त्याला वाटेत भेटला. तू परवा मला मोबाइल का दिला नाहीस म्हणून ज्ञानेश्वरला शिवीगाळ करू लागला. त्यानंतर थापड-बुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी गज त्याच्या डोक्यात मारला. यात ज्ञानेश्वरला गंभीर दुखापत झाली. यावेळी इतरांनी येऊन सोडवासोडवी केली. यावेळी नंदूने ज्ञानेश्वरला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत ज्ञानेश्वर बेले याने ८ ऑगस्ट रोजी दैठणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास लोखंडी गजाने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST