अतिघाई नडली; ट्रॅक्टरला ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॉलीखाली दुचाकी अडकली, एकजण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:15 IST2022-04-02T14:14:48+5:302022-04-02T14:15:33+5:30
हा अपघात पाथरी-आष्टी रस्त्यावर हदगाव बु पाटीजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास झाला.

अतिघाई नडली; ट्रॅक्टरला ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॉलीखाली दुचाकी अडकली, एकजण जागीच ठार
पाथरी (परभणी): ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्रोलीखाली दुचाकी अडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. अमोल बाळासाहेब काळे असे मृताचे नाव आहे. हा अपघात पाथरी-आष्टी रस्त्यावर हदगाव बु पाटीजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास झाला.
घनसावंगी येथून अमोल बाळासाहेब काळे ( २४) व युवराज विष्णू काळे ( दोघे राहणार लिंबोनी ता. घनसावंगी ) हे दोघे आज सकाळी दुचाकीवरून ( एमएच २१ एयु ०८८८ ) पाथरीमार्गे परभणीकडे जात होते. १० वाजेच्या दरम्यान हदगाव बु पाटीजवळ मरडसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर डबल ट्राली ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी मागील ट्रोली खाली अडकली.
यात अमोल काळे जागीच ठार तर युवराज काळे गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगनवाड यांनी भेट दिली. जखमीस पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.