पूर्णा येथे शिवसेनेकडून निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जळून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:25 IST2019-01-16T15:24:27+5:302019-01-16T15:25:02+5:30
आज सकाळी ११ वाजेच्या शहरातील शिवाजी चौकात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले.

पूर्णा येथे शिवसेनेकडून निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जळून निषेध
पूर्णा (परभणी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पूर्णा येथे शिवसेनेच्यावतीने निलेश राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.
आज सकाळी ११ वाजेच्या शहरातील शिवाजी चौकात शिवसेनेचे माजी नगरसेवक साहेबराव कदम, शहरप्रमुख मुंजा कदम, विक्की वैजवाडे, विद्यानंद तेजबंद आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत निलेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला़ त्यानंतर राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़ यावेळी भगवान सोळंके, मारोती भंगे, बबन कदम आदींची उपस्थिती होती.