ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:37 IST2025-06-21T15:36:19+5:302025-06-21T15:37:18+5:30

पाथरीत दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

Neither got a job nor got 3 lakhs back; Court orders Pathri couple to be charged with fraud | ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा

ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा

पाथरी : “मुलाला नोकरी लावतो” असे आमिष दाखवून एकाची   तब्बल 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पाथरी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बीड येथील दाम्पत्याविरोधात पाथरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तुकाराम धोंडीबा रुमाले (रा. भीमनगर, पाथरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एप्रिल 2022 ते मे 2022 या कालावधीत त्यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. या आमिषावर विश्वास ठेवून त्यांनी RTGS व रोख स्वरूपात एकूण तीन लाख रुपये दिले. मात्र, वेळ गेले तरी ना नोकरी मिळाली ना पैसे परत मिळाले. फिर्यादीने वारंवार विचारणा केल्यावर आरोपी प्रदीप बाबुराव पोटभरे आणि रागिनी प्रदीप पोटभरे ( रा. बीड) यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

अखेर फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर रुमाले यांनी न्यायालयात धाव घेतली, व न्यायालयाने CRPC 156(3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.या आदेशानंतर IPC कलम 403, 406, 417, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा तपास स.पो.नि. गायकवाड  हे करत आहेत

Web Title: Neither got a job nor got 3 lakhs back; Court orders Pathri couple to be charged with fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.