कंपनीचं नाव 'तिरंगा', पण तिरंग्याचीच विटंबना! क्रेनवर फाटलेला झेंडा तसाच सोडला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:19 IST2026-02-17T13:17:58+5:302026-02-17T13:19:52+5:30

क्रेनवर लावलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत आढळला; तिरंगा इन्फ्रा कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा!

National Flag Insulted: Case Filed Against Manager of Tiranga Infra Company in Parbhani’s Purna | कंपनीचं नाव 'तिरंगा', पण तिरंग्याचीच विटंबना! क्रेनवर फाटलेला झेंडा तसाच सोडला, गुन्हा दाखल

कंपनीचं नाव 'तिरंगा', पण तिरंग्याचीच विटंबना! क्रेनवर फाटलेला झेंडा तसाच सोडला, गुन्हा दाखल

पूर्णा (जि. परभणी) : पूर्णा तालुक्यातील ताडकळस टी पॉइंट धनगर टाकळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत तिरंगा इन्फ्रा कंपनीच्या गॅन्ट्री क्रेनवर भारतीय राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. या राष्ट्रध्वजाची कोणत्याही प्रकारची काळजी व निगा न घेतल्याने तो जीर्ण झाल्याचे रविवारी सायंकाळी पोलिसांनी केलेल्या पाहणीत आढळले. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाविरूद्ध राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पूर्णा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पूर्णा ठाण्यातील पोलिस शिपाई मोहित खान खुर्शीद खान पठाण यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांना मिळालेल्या माहितीवरून ताडकळस टी पॉइंट धनगर टाकळी गावाकडे जाणाऱ्या रोडलगत तिरंगा इन्फ्रा कंपनीच्या गॅन्ट्री क्रेनवर अनेक दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रध्वज लावण्यात आला असून, तो जीर्ण होऊन फाटल्याचे समजले. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक गजानन पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक मुजमुले, तोटेवाड, मुंडे यांनी सदरील ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तिरंगा इन्फ्रा कंपनीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावलेला व तो जीर्ण होऊन फाटलेला दिसून आला. पंचनामा करून राष्ट्रध्वज ताब्यात घेण्यात आला.

येथील कामगारांनी दिलेल्या माहितीवरून हा राष्ट्रध्वज कंपनीचे व्यवस्थापक सुजित धीरूभाई पटेल यांनी अनेक दिवसांपूर्वी लावल्याचे समजले. त्यावरून तिरंगा इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक सुजित धीरूभाई पटेल (३५, रा. अहमदाबाद, गुजरात) याच्याविरूद्ध राष्ट्रध्वज लावून त्याची कोणत्याही प्रकारची काळजी व निगा न घेतल्याने तो जीर्ण होऊन फाटलेला असल्याचे आढळल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title : तिरंगा कंपनी ने किया राष्ट्रीय ध्वज का अपमान: क्रेन पर फटा झंडा छोड़ा

Web Summary : पूर्णा में, 'तिरंगा' कंपनी के क्रेन पर फटा राष्ट्रीय ध्वज मिलने पर पुलिस कार्रवाई हुई। प्रबंधक सुजीत पटेल पर ध्वज का अनादर करने का आरोप है, क्योंकि यह उपेक्षित और फटा हुआ पाया गया। पुलिस में शिकायत दर्ज।

Web Title : Tiranga Company Insults National Flag: Torn Flag Left on Crane

Web Summary : In Purna, a 'Tiranga' company's torn national flag on a crane prompted police action. Manager Sujit Patel faces charges for disrespecting the flag after it was found neglected and tattered. A police complaint has been filed.