शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही; जिल्ह्यात पाच रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यभरातच म्युकरमायकोसिस या आजाराची धास्ती सर्वांनी घेतली आहे. जिल्ह्यातही या आजाराचे पाच रुग्ण नोंद झाले ...

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यभरातच म्युकरमायकोसिस या आजाराची धास्ती सर्वांनी घेतली आहे. जिल्ह्यातही या आजाराचे पाच रुग्ण नोंद झाले आहेत. हा काळ्या बुरशीचा आजार आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या मधुमेह, किडनी, कर्करोग यासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता असते. प्रत्येकाच्या शरीरात या काळ्या बुरशी असतात; परंतु प्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात वाढू लागतात आणि एक एक अवयव निकामी करतात. प्राथमिक स्तरावर या आजाराची लक्षणे आढळताच वैद्यकीय उपचार घेतल्यास तो बरादेखील होऊ शकतो; परंतु या आजाराकडे दुर्लक्ष केले तर मृत्यू ओढवतो. त्यामुळे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. स्वतःची तसेच परिसराची स्वच्छता ठेवणे, त्याचप्रमाणे काही लक्षणे आढळली तर तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेतल्यास रुग्णांना या आजारातूनही सुटका मिळू शकते. संपर्कातून हा आजार होत नाही. इतरांना त्याची लागण होण्याची कोणतीही भीती नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात औषधी उपलब्ध

म्युकरमायकोसिस या आजारावर रुग्णांना प्राथमिक स्तरावर उपचार करण्याची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहे. मध्यंतरी या आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधीचा तुटवडा निर्माण झाला होता; परंतु तो आता पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.

म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना अँफो टेरेसिन बी हे इंजेक्शन द्यावे लागते. या इंजेक्शनचा पुरेसा साठा जिल्ह्यात सध्या उपलब्ध आहे.

मात्र लवकर हा आजार दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्यानंतर काही रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते. ही सुविधा मात्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. अशा रुग्णांना इतर जिल्ह्यातच उपचारासाठी जावे लागते.

म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे

नाकातून रक्त बाहेर पडणे, डोळ्याच्या भोवती सूज येणे, डोळा लाल होणे, अति डोके दुखणे, नजर कमी होणे, एकाच वेळी दोन दोन व्यक्ती दिसणे, दात दुखणे, दाताच्या भोवती काळा स्तर जमा होणे अशी प्राथमिक लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास रुग्णाने तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ही घ्या काळजी

मधुमेह, डायलेसिसवरील रुग्ण, कर्करोग रुग्णांनी यासंदर्भात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत. आठवड्यातून किमान एक वेळेस शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून घ्यावे, तसेच काही लक्षणे आढळल्यास कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्यावी. प्रतिकारक्षमता कमी असणाऱ्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता असते; त्यामुळे अशा रुग्णांनी परिसर आणि स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

म्युकरमायकोसिस हा संपर्कामुळे होत नाही; परंतु गंभीर आजार असणाऱ्या आणि ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे अशा रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह, किडनी आणि ज्यांना प्रतिकारक्षमता वाढीसाठी औषधी सुरू आहेत, अशा रुग्णांनी वेळोवेळी कान नाक घसा तज्ज्ञामार्फत तपासणी करणे तसेच शुगर तपासणी नियमित करणे आवश्यक आहे.

डॉ. तेजस तांबोळी, कान, नाक, घसा तज्ज्ञ

गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान एक वेळेस कान नाक घसा तज्ज्ञ मार्फत तपासणी करून घ्यावी, डोळ्यावर सूज, दात दुखू लागणे, टाळू दुखणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेतले पाहिजेत.

डॉ. रूपेश नगराळे, मधुमेह तज्ज्ञ

म्युकरमायकोसिस हा संपर्कातून न होणारा आजार आहे. ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे, अशांना डोळ्यांना सूज येणे, डोळा दुखणे, नजर कमी होणे अशी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

डॉ. हनुमंत भोसले नेत्रतज्ज्ञ