शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

गंगाखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जखमी दोघांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 6:36 PM

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना आज चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी राज्य महामार्गावर निळा पाटीजवळ घडली. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गंगाखेड : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना आज चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी राज्य महामार्गावर निळा पाटीजवळ घडली. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गंगाखेड येथून विष्णु भगवान पवार ( २५ वर्ष ), मोहन बालासाहेब हरकडे ( ३० वर्ष) व सर्जेराव गणपत राठोड हे तिघे दुचाकीवरून परळीकडे निघाले होते. निळा पाटीजवळ येताच त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विष्णु,मोहन व सर्जेराव तिघेही जखमी झाले. याच दरम्यान परळी येथुन गंगाखेडकडे जाणारे बुरूड समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव ठेवरे व भारत तमखाने, अजित जैस्वाल यांना जखमी झालेले तिघेही नजरेस पडले. यानंतर त्यांनी तिन्ही जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ केशव मुंडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, परिचारिका निता देशमुख, राजेंद्र गायकवाड, प्रशांत राठोड यांनी जखमींवर तात्काळ प्रथमोपचार केले. जखमी मधील विष्णु पवार व मोहन हरकडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्या दोघांनाही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. या  प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी