शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्येही धावेना ग्रामीण भागात लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ...

परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक फेऱ्या बंद असल्याने एस.टी.महामंडळाची लालपरी केवळ शहरवासीयांसाठीच धावते की काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांना पडू लागला आहे.

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांचा समावेश आहे. या सात आगारांकडे ४४५ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून कोरोना संसर्गाच्या अगोदर दरदिवस १८३५ फेऱ्या करण्यात येत होत्या. यातून एकट्या परभणी बसस्थानकावर १० हजार प्रवाशांची ने-आण करण्यात येत होती.

मात्र, आता अनलॉक झाले असतानाही सात आगारांतून केवळ ११२६ बसफेऱ्या करण्यात येत आहेत. त्यातही शहरी भागातच जास्त बसेस धावत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाची लालपरी कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

७०९ बसफेऱ्या

अद्यापही बंदच

कोरोना संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या १८३५ फेऱ्या नियमित होत असत; मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महिनाभरापासून बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. केवळ ११२६ बसफेऱ्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाला ७०९ बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत.

उत्पन्न वाढेना

कोरोना संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जवळपास १८३५ फेऱ्या दिवसभरात होत होत्या. यातून दिवसभरात ५० लाखांहून अधिक उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या सात आगारांना मिळत होते. मात्र, सध्या केवळ ११२६ बसफेऱ्या सुरू आहेत. त्यातही बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

दिवसाकाठी कसेबसे १९ लाख रुपयांचे उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या हातात पडत आहे. त्यामुळे महिनाभरापासून एस.टी.महामंडळाची सेवा सुरू होऊनही उत्पन्न वाढत नसल्याने प्रशासनाच्या काळजीत भर पडली आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविल्यास उत्पन्नात भर पडेल.

सेलू, जिंतूर, पाथरी शहरांकडेच ओढा

जिल्हा प्रशासनाने एस.टी. महामंडळाला परवानगी दिल्यानंतर विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून आगारप्रमुखांना बस सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

मात्र, आगार प्रशासनाने ग्रामीण भागात प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बसेस सुरू करणे गरजेचे होते.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पाथरी, सेलू, जिंतूर या शहरांकडे सर्वाधिक बसफेऱ्या सुरू झाल्या.