शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये १७ ते २० सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 19:09 IST

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोना प्रतिबंध कृती समितीचा निर्णय

ठळक मुद्देतालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे़ गंगाखेडमध्ये माजी आमदारासह पोलीस कर्मचारी बाधित

गंगाखेड : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील व्यापारी संघटना आणि कोरोना प्रतिबंध कृती समितीच्या वतीने १३ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली असून, १७ ते २० सप्टेंबर या काळात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

गंगाखेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे़ सद्यस्थितीत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे़ एका ग्रामविकास अधिकाऱ्यासह शहर व तालुक्यातील १८ जणांचा कोरोनमुळे मृत्यू झाला आहे़ हा संसर्ग वाढत असल्याने तालुक्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़  कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने शहरातील जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी बैठक घेतील़ या बैठकीत १७ ते २० सप्टेंबर या काळात स्वयंर्स्फूतीने जनता कर्फ्यू लागू करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला़ या जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत औषधी दुकाने आणि सकाळी ७ ते ११ यावेळेत खत, बियाणांची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे़ 

गंगाखेडमध्ये माजी आमदारासह पोलीस कर्मचारी बाधितयेथील पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील बाधित रुग्णांची संख्या १५ झाली आहे. शहर व तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.  येथील उपजिल्हा रुग्णालयात १४ सप्टेंबर रोजी १७ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात गंगाखेड पोलीस ठाण्यातील ३५ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्यासह भंडारी कॉलनीतील ६६ वर्षीय पुरुष, पाठक गल्लीतील ७२ वर्षीय पुरुष, बळीराजा कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला आणि बीड येथील ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. ३४१ जण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले असून, १०८ जणांवर उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी