शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

साठ वर्ष राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार म्हणायला लाज कशी वाटत नाही ? : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 7:43 PM

६०-६० वर्षे राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार असे विरोधक म्हणत आहेत

पाथरी (परभणी ) : साठ-साठ वर्षे राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार असे राहुल गांधी, शरद पवार म्हणत आहेत. तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असे उपरोधिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केली.

परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ पाथरी येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, उमेदवार संजय जाधव, आ.मोहन फड, आ.राहुल पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, सुरेश ढगे, माजी आ.विजय गव्हाणे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी परवा म्हणाले, गरिबी हटवणार, पवार साहेब म्हणाले आम्ही गरिबी हटवणार, आता राहुल गांधीचे पंजोबा देशाचे पंतप्रधान होते. तेव्हाही गरिबी हटवाचा नारा होता. राहुल गांधीच्या आजी पंतप्रधान झाल्या, तरीही गरिबी हटली नाही, उलट गरिबी वाढली. त्यानंतर त्यांचे वडील पंतप्रधान झाले, त्यांनीही तोच नारा दिला, मग त्यांच्या आई या ठिकाणी पंतप्रधान झाल्या. गरिबी हटली नाही, गरिबी वाढली. आता पुन्हा ते आम्हाला निवडून द्या, गरिबी हटवतो, असे म्हणत आहेत. ६०-६० वर्षे राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार असे विरोधक म्हणत आहेत, यांना लाज कशी वाटत नाही? असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस- राष्ट्रवादीचे एकच धोरण आहे, ते म्हणजे गरिबी नव्हे तर त्यांची, त्यांच्या नेत्यांची, चेल्याचपट्यांची  गरिबी हटविणे, त्यांना गरिबांविषयी काहीही घेणे-देणे नाही. राहुल गांधींची सर्व भाषणे काल्पनिक आहेत. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांना गरिबीविषयी काहीही घेणे-देणे नाही, असे वाटते. ज्या प्रमाणे टीव्ही सिरियलच्या आधी एक सूचना येते, त्यात मालिकेतील सर्व पात्र, कथानक काल्पनिक आहे, त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. पहायचं असेल तर तुमच्या स्वत:च्या भरोस्यावर बघा, तुम्ही त्याला खर मानलं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. आम्ही केवळ मनोरंजनाकरीता ही मालिका दाखवत आहोत. तसचं राहुल गांधींचे भाषण सुरु होताना टीव्हीवाले अशा सूचना देतील, अशीही उपरोधिक टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, ओपनिंग बॅटस्मन व कॅप्टनने सामना सुरु होण्यापूर्वीच निवृत्ती घेतली. पराभवाच्या भितीने ते मॅचच खेळले नाहीत आणि हरलेल्या मनाने कोणीही निवडून येऊ शकत नाही, याची त्यांना जाणीव आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparbhani-pcपरभणीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019