हॉटेलचालकाची अडीच लाखांची सोन्याची चेन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST2021-03-05T04:17:50+5:302021-03-05T04:17:50+5:30

सेलू येथील चक्रधर पिता गुलाबराव पौळ यांचे मंठा रोडवर हॉटेल आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांनी घाम ...

Hotelier's gold chain lamps worth Rs 2.5 lakh | हॉटेलचालकाची अडीच लाखांची सोन्याची चेन लंपास

हॉटेलचालकाची अडीच लाखांची सोन्याची चेन लंपास

सेलू येथील चक्रधर पिता गुलाबराव पौळ यांचे मंठा रोडवर हॉटेल आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांनी घाम आल्याने औरंगाबादहून खरेदी केलेली ४७ ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चेन गल्ल्यात काढून ठेवली. त्यानंतर ते ६ वाजता लघुशंकेसाठी हॉटेलच्या मागे गेले. त्यानंतर ६.१५ वाजता ते परत हॉटेलमध्ये गल्ल्यावर आले. त्यानंतर त्यांनी गल्ल्यातील चेन पाहिली असता ते गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमधील नोकरांना याबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी सेलू पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांनी त्यांच्या गल्ल्यातील २ लाख ४७ हजार ४८० रुपयांची चेन चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Hotelier's gold chain lamps worth Rs 2.5 lakh