परभणी पोलिसांकडून गहाळ झालेले २५० मोबाईल मालकांच्या हाती; ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:07 IST2026-01-27T12:05:53+5:302026-01-27T12:07:10+5:30
आशा सोडली होती, पण मोबाईल मिळाले परत; परभणी पोलिसांचे २५० नागरिकांना प्रजासत्ताक दिनी गिफ्ट

परभणी पोलिसांकडून गहाळ झालेले २५० मोबाईल मालकांच्या हाती; ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- राजन मंगरूळकर
परभणी : मागील दोन वर्षात शहरातील विविध भागातून गहाळ झालेले मोबाईल सापडतील याची अनेकांनी आशा सोडली होती. मात्र या मोबाईल धारकांना जिल्हा पोलीस दलाने सुखद धक्का दिला. २६ जानेवारी रोजी जवळपास २५० मोबाईल हे संबंधितांना बोलावून खात्री करून परत करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरातील नवा मोंढा, नानलपेठ, कोतवाली ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलची तक्रार नोंदविलेल्या मागील दोन वर्षातील मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल सापडून परत देण्यात आले. हा कार्यक्रम सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला. याप्रसंगी ४० लाखापेक्षा अधिक किमतीचे २५० वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हे मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कदम, महादेव मांजरमकर, विश्वजीत कासले यांच्यासह सायबर चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.