परभणी जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:42 IST2018-05-13T00:42:14+5:302018-05-13T00:42:14+5:30
जिल्ह्यात साधारणत: एक महिन्यापासून उन्हाचा पारा तापत असून शनिवारी पुन्हा एकदा या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद वनामकृविच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.

परभणी जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात साधारणत: एक महिन्यापासून उन्हाचा पारा तापत असून शनिवारी पुन्हा एकदा या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद वनामकृविच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.
महिनाभरापासून ऊन तापत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुले आणि वृद्धांना तर सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. सेलू व सोनपेठ येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. १२ मे रोजी जिल्ह्यातील तापमान ४४ अंशावर पोहचले होते. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या.
दरम्यान, शनिवारी दिवसभर ऊन तापत असताना सायंकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग वाढला होता. मानवत येथे वाºयासह पाऊसही झाला. तर येलदरी परिसरात नभ दाटून आले होते. तसेच विजेच्या कडकडाटासह वादळी वारे झाले. परभणी शहरातही सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जोरदार वाहने वाहत होते. अचानक आलेल्या वाºयामुळे रस्त्यावरील धूळ नागरिकांच्या डोळ्यामध्ये जात होती. तसेच धुळीमुळे काही अंतरावरील दिसेनासे झाले होते. शनिवारी लग्नतिथी जास्त असल्याने या वाºयाचा वºहाडी मंडळींना चांगलाच फटका सहन करावा लागला.