शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने ओढ्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST

परभणी : जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस होत आहे. रविवारी परभणी शहर आणि परिसरात दिवसभर दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे ...

परभणी : जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस होत आहे. रविवारी परभणी शहर आणि परिसरात दिवसभर दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे तालुक्यातील ओढ्यांना प्रथमच पूर आला आहे.

चार दिवसांपूर्वी पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन ही पिके हातची जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, ऐनवेळी पावसाचे पुनरागमन झाले आहे. तब्बल पंधरा दिवसांनंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला असून, दररोज पाऊस होत आहे. शनिवारी परभणी शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रविवारी देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पावसाची रिपरिपही सुरू होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर धरला. दोन तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत शहर आणि परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरूच होती. अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.

परभणी तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने तालुक्यातील ओढे, नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली. परभणी- सायाळा या मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच शहरातही अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली.

रविवार हा सुटीचा दिवस आणि त्यात दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूकही विरळ झाली होती. नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान, जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावले आहेत. खरीप हंगामातील पिकांना या पावसाने जीवदान दिले आहे.