शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरही महिलांचा छळ, सायबरकडे १५ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाइल आला आहे. यातच कोरोनाच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. यामध्ये व्हाॅट‌्स अप, ...

सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाइल आला आहे. यातच कोरोनाच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. यामध्ये व्हाॅट‌्स अप, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांचा वापर अनेकांकडून केला जात आहे. यात महिला, तरुणी यांचाही सक्रिय सहभाग या सर्व समाज माध्यमावर सध्या सुरू असल्याचे दिसून येते. याचाच गैरफायदा काही मनोविकृत व हँकर्स तसेच अनोळखी व्यक्ती घेत आहेत. या माध्यमातून महिला, मुलींचा मानसिक छळ केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. यामुळे महिला व मुलींनी या सर्व माध्यमांचा वापर करताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

कुठल्या प्रकारचा होतो छळ

घाणेरडे मेसेज पाठविणे

अश्लील व्हिडिओ पाठविणे

बनावट खाते उघडून त्याचा प्रसार करणे

मुलींचे व्हाॅट्स अपवरील फोटो चोरून त्याचा गैरवापर करणे

अशी घ्यावी काळजी

मुली, महिलांनी स्वत:चा एकट्याचा फोटो प्रसारित करू नये

अनोळखी व्यक्तीला आपल्या सोशल मीडिया खात्याशी जोडू नये.

गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.

सर्व खाते वापरताना त्याचा पासवर्ड जन्म तारीख, मोबाइल नंबर ठेवू नये.

येथे करा तक्रार

देशाच्या गृह विभागाने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल नावाची वेबसाईट केवळ अशा प्रकारची फसवणूक किंवा छळ झाल्यास तक्रार नोंद करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये सायबर क्राईममध्ये तक्रार नोंद करता येते. तसेच जिल्ह्याच्या सायबर सेलकडे थेट गुन्हा नोंदविता येतो.

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक

महिला तसेच मुली या प्रकाराबाबत शक्यतो बदनामी होईल या भीतीने त्रास सहन करतात. त्या पुढे येत नाहीत. यासाठी तक्रार केल्यास समोरच्या व्यक्तीला चाप बसण्यासाठी महिला, मुलींनी तत्काळ तक्रार करावी.

महिला व मुलींनी स्वत: सोशल माध्यमावर वावरताना आपल्या एकट्याचा फोटो डीपीवर स्टेटसला तसेच अन्य ठिकाणी ठेवू नये. जर कोणी त्रास देत असेल तर त्याची थेट तक्रार करावी. - संतोष शिरसेवाड, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.

सायबर सेलने घेतल्या कार्यशाळा

शहरातील महाविद्यालयीन मुली तसेच तरुणी व महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घ्यावी, यासाठी ४ ते ५ ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच शहरातील एटीएम, खासगी, शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालय येथे भित्तीपत्रक, बॅनर लावले आहेत. या कार्यशाळेसाठी संतोष व्यवहारे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, राजेश आगाशे, रवींद्र भूमकर, गौस पठाण, राम घुले यांनी प्रयत्न केले.

मुलीकडूनही दुसऱ्या मुलीची बदनामी

काही प्रकरणात वैयक्तिक कारणावरून जिल्ह्यात २ वेगवेगळ्या प्रकरणात २ मुलींनी दुसऱ्या मुलीची, तसेच अन्य एका प्रकरणात मुलाची बदनामी करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात गंगाखेड, पालम, पाथरी व परभणी शहरात असे गुन्हे घडले आहेत.

वर्ष एकूण तक्रारी महिलांनी केलेल्या तक्रारी

२०१८ १० २

२०१९ १५ २

२०२० १० ७

२०२१ १५ ३

जिल्ह्यात दोन हजार अठरा ते एकवीस या चार वर्षात ५० तक्रारी दाखल झाल्या यापैकी पंधरा महिलांनी गुन्हे दाखल केले आहेत काही जणांकडून महिला व मुलींच्या फोटो तसेच गोपनीय माहितीद्वारे त्यांना त्रास दिला जाण्याचा प्रकार वाढत आहे. काही जणांकडून महिला व मुलींच्या फोटो तसेच गोपनीय माहितीद्वारे त्यांना त्रास दिला जाण्याचा प्रकार वाढत आहे.