शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी लिंबा येथे झाली गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:15 IST

‘नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा’ परभणी : १९ व २० मार्च रोजी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ...

‘नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा’

परभणी : १९ व २० मार्च रोजी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्यावतीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

आठ दिवसांपासून खंडाळी अंधारात

खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील वीज महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिलाच्या वसुलीसाठी आठ दिवसांपासून वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. थकीत बिलाच्या ३० टक्के रक्कम ग्रामस्थांनी भरावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता गिरी यांनी केले आहे.

ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंताग्रस्त

खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

कृषी कार्यालय बंद; ग्रामस्थांची गैरसोय

ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील कृषी मंडळ निरीक्षक कार्यालयाच्या इमारतीची दूरवस्था झाल्याने हे कार्यालय मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे ताडकळस व परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

हरभऱ्याचे चुकारे देण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २०८ शेतकऱ्यांचा २ हजार ८४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत एकाही शेतकऱ्याचे चुकारे हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून अदा करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

‘कोविड-१९ चे लसीकण सुरू करा’

परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी अद्यापही कोविड-१९ चे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पेडगाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लसीकरण सुरू करावे.