गोदावरी पात्रातील अनधिकृत कृषिपंपाचा वीज पुरवठा तोडला; पाणीसाठे सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 07:09 PM2018-11-17T19:09:03+5:302018-11-17T19:09:27+5:30

महसूल विभागाने गोदावरी पात्रातील ढालेगाव आणि रामपुरी येथील अवैधरीत्या 65 वीज मोटारीचा वीज पुरवठा खंडित केला. 

Godavari disrupted power supply of unauthorized agriculture; Administration action to protect water resources | गोदावरी पात्रातील अनधिकृत कृषिपंपाचा वीज पुरवठा तोडला; पाणीसाठे सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची कारवाई 

गोदावरी पात्रातील अनधिकृत कृषिपंपाचा वीज पुरवठा तोडला; पाणीसाठे सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची कारवाई 

Next

पाथरी (परभणी ) :  तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाई सदर्श परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाने सार्वजनिक जलसाठे सुरक्षित ठेवली आहेत. यासाठी महसूल विभागाने गोदावरी पात्रातील ढालेगाव आणि रामपुरी येथील अवैधरीत्या 65 वीज मोटारीचा वीज पुरवठा खंडित केला. 

पाथरी तालुक्यात या वर्षी पावसाळ्यात दोन महिने पावसाने खंड दिल्याने या काळात सरासरी पेक्षा 53 टक्के एवढा पाऊस झाला. यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. शासनाने तालुका गंभीर दुष्काळग्रस्त  म्हणून जाहीर केला आहे. यामुळे प्रशासनाने तालुक्यातील जलसाठे, मोठे,मध्यम लघु तलाव , नदी नाले अशा  सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या साठ्यांना संरक्षित करण्यास सुरुवात केली. तसेच अनधिकृतरीत्या सुरु असलेला पाण्याचा उपसा रोखण्याचे आदेश देण्यात आले. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तालुकास्तरीय संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकात महसूल, वीज वितरण आणि जायकवाडी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.  तहसीलदार नीलम बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नवगिरे ए एन, जायकवाडी चे शाखा अभियंता कलशेट्टी एम बी, वीज वितरण चे अभियंता सुनील चौरे , वीज वितरण चे अभियंता नितेश रायपुरे, मंडळ अधिकारी जे डी बिडवे यांच्या पथकाने गोदावरी पात्रात सलग दोन दिवस कारवाई केली. 

ढालेगाव आणि रामपुरी येथे कारवाई 
पथकाने 16 आणि 17 नोव्हेंबर दोन दिवस गोदावरी नदीच्या ढालेगाव बंधारा कार्यक्षेत्रात रामपुरी येथील 5 डीपी वरील 40 कृषी पंप तर ढलेगाव येथील 2 डीपी वरील 40 कृषीपंपाचा वीज पुरवठा तोडला. झरी येथील तलावात मात्र एकही पंप आढळला नाही.

तर जप्तीची कारवाई
पाणी टंचाई सदर्श परिस्थिती निर्माण झाल्याने वरीष्ठ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गोदकाठच्या भागात अवैध पाणी उपसा रोकण्यात येत असून सर्व गावात दौंडी आणि सूचना देण्यात आल्या आहेत पुढे पाणी उपसा सुरू राहीला तर जप्ती ची कारवाई केली जाईल
- ए. एन. नवगिरे, नायब तहसिलदार, पथक प्रमुख

Web Title: Godavari disrupted power supply of unauthorized agriculture; Administration action to protect water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.