सेलू बसस्थानकात मुलींनी रोडरोमियोंना चप्पलने चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 18:24 IST2018-09-28T18:20:12+5:302018-09-28T18:24:39+5:30
पाठलाग करत छेडछाड करणाऱ्या दोन रोडरोमियोंना विद्यार्थ्यानीनी चप्पलने चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

सेलू बसस्थानकात मुलींनी रोडरोमियोंना चप्पलने चोपले
सेलु (परभणी): पाठलाग करत छेडछाड करणाऱ्या दोन रोडरोमियोंना विद्यार्थ्यानीनी चप्पलने चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार आज दुपारी २ वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात घडला.
ग्रामीण भागातील शेकडो मुली शिक्षणासाठी बसने येणेजाणे करतात. आज दुपारी शाळेतून काही मुली बस स्थानकाकडे येत होत्या. या दरम्यान पारिक काॅलनी येथे दोन रोडरोमियोंनी या मुलींचा पाठलाग सुरु केला. तसेच त्यांना नाव सांगा ना, सांगावेच लागेल असा विचारत छेड काढली. या मुली घाबरतच बसस्थानकात आल्या. येथेही त्यांचे छेडणे सुरूच होते. यामुळे संतापलेल्या मुलींनी त्या रोडरोमिओंची चप्पलेने मारत चांगलीच धुलाई केली. बसस्थानकातील काही प्रवासी व मुलीसुद्धा यात शामिल झाल्या. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेचा व्हिडिओ काही शहरात व्हायरल झाला असून अशा घटना वाढल्याने मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.