परभणीत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:25 IST2019-01-07T14:25:30+5:302019-01-07T14:25:41+5:30

कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला़

Ghoshanabaji before the District Collector of Parbhani by Talathi and Mandal officials | परभणीत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी

परभणीत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी

परभणी- तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून, सकाळी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर कार्यालयात दाखल होत असताना या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला़ 

तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन रद्द करावे, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ७ जानेवारीपासून  बेमुदत संप सुरू केला आहे़ या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाहीचा इशारा दिला होता़ तरीही कर्मचारी संपात सहभागी झाले असून, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर कार्यालयात दाखल होत असताना या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली़

Web Title: Ghoshanabaji before the District Collector of Parbhani by Talathi and Mandal officials