मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 09:37 IST2021-09-12T09:37:24+5:302021-09-12T09:37:42+5:30

Accident in Parbhani : दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत

The four who were doing the morning walk were blown up by an unknown vehicle; two died on the spot | मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

पाथरी / मानवत :  पहाटे चार वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने उडवल्याची घटना पाथरी-पोखरणी रस्त्यावर केकरजवळा घडली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये केकरजवळा येथील पोलीस पाटील यांचा समावेश आहे

पाथरी-पोखरणी रस्त्यावर परभणीकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मानवत तालुक्यातील केकरजवळा चार जणांना उडवले. चार ही जण गावातून राष्ट्रीय महामार्ग 222 वर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. उत्तमराव नामदेव लाडाने (52,पोलीस पाटील केकरजवळा),आत्माराम भीमराव लाडाने (42 ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदकिशोर साहेबराव लाडाने (50), राधेश्याम रामभाऊ लाडाने ( 48 ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना परभणी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Web Title: The four who were doing the morning walk were blown up by an unknown vehicle; two died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.