परभणी जिल्ह्यात आणखी चौघांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:39 IST2020-07-02T13:39:16+5:302020-07-02T13:39:42+5:30
परभणी शहरातील दर्गा रोड भागातील २१ वर्षे आणि २८ वर्षे अशा दोन युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

परभणी जिल्ह्यात आणखी चौघांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
परभणी : मागील आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गुरुवारी सकाळी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांची धडधड वाढली आहे.
परभणी शहरातील दर्गा रोड भागातील २१ वर्षे आणि २८ वर्षे अशा दोन युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यातील झरी येथील एक ७५ वर्षीय वृद्ध महिला आणि ९ वर्षाच्या मुलास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हे चारही रुग्ण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. गुरुवारी सकाळी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परभणीकर चिंतेत आहेत. जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. त्यापैकी ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २७ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.