पूर्णा येथे आगीत घर भस्मसात; मुलीच्या लग्नाचे सामानही जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 18:30 IST2018-04-06T18:30:39+5:302018-04-06T18:30:39+5:30

मस्तानपुरा परिसरातील एका घराला आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली.

Fire at home in Purna; Girl's wedding accessories also burnt | पूर्णा येथे आगीत घर भस्मसात; मुलीच्या लग्नाचे सामानही जळाले

पूर्णा येथे आगीत घर भस्मसात; मुलीच्या लग्नाचे सामानही जळाले

पूर्णा (परभणी) : मस्तानपुरा परिसरातील एका घराला आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. यावेळी घरी कोणी नसल्याने यात घराचे मोठे नुकसान झाले. आगीत घरातील संपूर्ण सामान भस्मसात झाले असून यात मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या सामानाचाही समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मस्तानपुरा परिसरात शे हबीब शे हुसेन यांच्या मालकीच्या घरात शे महेबूब खाजा हे भाड्याने राहतात. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. यावेळी घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर होते. यामुळे आग वाढत गेली व घरातील संपूर्ण सामान जळून राख झाले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील युवकांनी तिकडे धाव  घेतली. रस्ता अरुंद असल्याने अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचू शकला नाही. यामुळे शेवटी तेथील नागरिकांनी प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण घर जळाले होते.

यात शेख महेबूब यांनी मुलीच्या लग्नासाठी घेतलेले फर्निचर,कपडे अशा सामानाचाही समावेश आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राथमिक अंदाजानुसार आगीत १३ हजार रुपये रोख व मुद्देमाल जळून जवळपास  अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.

Web Title: Fire at home in Purna; Girl's wedding accessories also burnt