भाजपा पदाधिकाऱ्याची गुंडगिरी; गटविकास अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 10:39 IST2019-01-25T10:37:45+5:302019-01-25T10:39:33+5:30

भाजपा तालुकाध्यक्षांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

fir against bjp leader and five others for beating bdo in parbhani | भाजपा पदाधिकाऱ्याची गुंडगिरी; गटविकास अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण

भाजपा पदाधिकाऱ्याची गुंडगिरी; गटविकास अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण

परभणी: गटविकास अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना आमदाराच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईची आढावा बैठक घेतल्याचा राग मनात धरुन भाजपा तालुकाध्यक्ष राजेश देशमुख यांनी गटविकास अधिकाऱ्याला मारहाण केली. अद्याप या प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 

परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी पाणी टंचाईची आढावा बैठक घेण्यात आली. त्यामुळे भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश देशमुख संतापले. त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना घरात घुसून बेदम मारहाण केली. या प्रकरणी ढोकणेंनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर देशमुख यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे. 
 

Web Title: fir against bjp leader and five others for beating bdo in parbhani

टॅग्स :BJPभाजपा