जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:17 IST2021-02-08T15:15:03+5:302021-02-08T15:17:06+5:30
the fire case of the district hospital Parabhani जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणि याच परिसरातील धोबीघाट येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन ठिकाणी लागलेल्या आगीच्या प्रकरणात नानलपेठ पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या मजल्यावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणि याच परिसरातील धोबीघाट येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणात जीवित हानी झाली नसली तरी घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी दीपक मोहोळकर यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे रविवारी रात्री उशिरा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रकाश डाके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जी.टी. बाचेवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आग लावल्याचा संशय
धोबीघाट भागात लागलेल्या आगीत साधारणतः २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. धोबी घाटाच्या पाठीमागील बाजूस कचरा जमा करून त्यास आग लावण्यात आली. त्यानंतरही आगीचे निखारे खिडकीतून टाकले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.